भेट तुझी माझी स्मरते
रात्र उगाचच का जागते
वाट वळणावर नित्य भेटे
सल काळजात काहूर पेटे
वाद तर नेहमीच होतात
वेळ आहे का सांग बोलायला
अशी हक्क मैत्रीत सांगते
रात्र उशाशी बसुनी झुरते
काल परवा होती एक ती
आज उद्याची पोरकी भाव जगते
वाद तर नेहमीच होतात
वेळ आहे का सांग बोलायला
हुल देतो असा विश्वास ही मग
जग बदलाची भाषा उगा बोलतो
दुर होता नाळ मातीची ती
नाती पुसतात का ओळख कधी ती
वाद तर नेहमीच होतात
वेळ आहे का सांग बोलायला
तुझ तुज जवळ नांदी आहे मोठी
माझं उदारपण त्यात मावेल का थोड़..
जमा होतील थकलेल्या आठवणी
क्षमा होतील का त्या चुका कधी तरी
चुक नव्हतीच अशी दुजी काही
बंध रेशमातला दुवा निकामी झाला
तिच पुसटशी ओळख जपयला
हाक भावनेनी ती मारली होती
वाद तर नेहमीच होतात
वेळ आहे का सांग बोलायला
Loading comments…