भेट श्रावणाची
"भेट श्रावणाची" आली
मनी सखीची दाटली
चिंब ओला गारवा
माहेरवाशिणी आली ...
श्रावणाची ती झोके
सखीचा तो अल्हड सहवास
श्रावणाची ती गाणी
मातीचा दरवळणारा वास...
शेतात झुलती सोने शेतकऱ्यांची
सरी पावसाची मनी भरायची आहे
सणाच्या वारांच्या या श्रावणाला
उमंग चैतन्याची आणायची आहे...
पिऊन गारवा सखी चालली
माहेरची आठवण उरात कोरली
पुढच्या वर्षी ये ग सखे पुन्हा
सहवाची फक्त भाषा उरली...
उमाकांत काळे, अकोला
९९२२८५५५३९
Loading comments…