चांदण्यांच्या नेहमी गप्पा रंगे
विषय माञ एकच असे
चंद्र किती दिसतो छान
बोलतो किती सुरेख छान.
एक चांदणी, चंद्राला
पहायला दुरवरून यायची
बोलला नाही चंद्र तरी
डोळे भरून बघायची.
चंद्राला पाहून चांदणी
स्वत:स भुलून गेली
चेहऱ्यावरची कळी तिच्या
हळूच खुलून गेली.
चांदणी म्हणे चंद्राला
आपण दोघे मैञी करू
जीवनाच्या अखेरपर्यंत
सोबतीला राहू.
चांदणीच्या शब्दाला
चंद्राने होकार दिला
तुला ठेवीन ह्रदयात
म्हणून शब्द दिला.
चंद्र आणि चांदणीची
गट्टी आता जमली
रोज गप्पा गोष्टी
संगत आता रंगली.
का कुणास ठाऊक
चांदणीस काहीच भान नसे
चंद्राशिवाय बिचारीला
काहीच न सुचे.
चंद्राच्या साथीने चांदणी
आनंदात राहते
देवालाही आजकाल
ती चंद्रातच शोधते.
चांदणी बिचारी रोज
तिळतिळ तुटते
चंद्रासाठी देवाकडे
रोज काही मागते.
देऊ लागला देव तर
एकच मागीन त्याला
सुखी ठेव म्हणीन
चांदणीच्या त्या चंद्राला.
Comments
Loading comments…