120Log inSign up
by Urmi Hemashree Gharatदिवस गुलाबी थंडीचे..
Details

प्रसन्नतेचा नजराणा घेऊन

ऊत्साहाने येती रविकिरणे

दिवस गुलाबी थंडीचे

दवबिंदुचे पडती सडे|


पक्षीही गाती मंजुळ गाणी

फुलपाखरे भिरभिरती हौसेने

दिवस गुलाबी थंडीचे

ओढती मऊ धुक्याचे गालिचे|


गार वारा हवाहवासा

मन बेधुंद करे अल्लडपणे

दिवस गुलाबी थंडीचे

दावे तुझाचं वावर चोहीकडे

दावे तुझाचं वावर चोहीकडे.|



Loading comments…