एक छान मुलगी
आहे खुप गुणी
नाव तिचे त्रिवेणी
पण म्हणतात राणी
पहाटे उठून लवकर
राणी जाते अंगणी
झाडलोट करते ती
हाती घेऊन केरसुणी
सडासारवण करून
वेलींना देते पाणी
स्वतः होते तयार
करते वेणीफणी
अभ्यास करते पूर्ण
वाचून काढते म्हणी
पाठ करते पाढे आणि
गाते गोड गोड गाणी
राणी जाते शाळेत
सोबत खुप मैत्रिणी
Loading comments…