भिरभिर आकाशी चुंबने घेई
आता झोका माझा उंच जाई ।।धृ।।
सहवास तुझा रे सख्या
झोका उंचावी, साथ तुझी असावी
नक्षत्राचे देणे, प्रेम झोक्यावरी फुलावी
दे उंच झोका, उंच भरारी माझी दिसावी
भिरभिर आकाशी चुंबने घेई
आता झोका माझा उंच जाई ।।१।।
मनात माझ्या भिरभिरायचे
तरी मजा झोक्यावरी घ्यायचे
सखीची कुजबुज चालायची
सारखी मागे मागे पावले घ्यायचे
भिरभिर आकाशी चुंबने घेई
आता झोका माझा उंच जाई ।।२।।
प्रितीचा तुझा रे हा गोडवा
मंदावला हा वारा
गीत झोक्यावरी तुझे माझे
मंजुळवाहती नदीच्या धारा
भिरभिर आकाशी चुंबने घेई
आता झोका माझा उंच जाई ।।३।।
उंच वडाच्या झाडांची किमया
मी घेतला उंच आता झोका
वरुन खाली करे झोका
फक्त मला घेऊ द्या आता झोका
भिरभिर आकाशी चुंबने घेई
आता झोका माझा उंच जाई ।।४।।
Loading comments…