जीव जडला तुझ्यावर
सांगू कुणा जवळ
डोळ्यांचे इशारे
काढ थोडी सवड
जाऊ कुठेतरी
नसणार जिथे कोणी
तू आणि मीच मी
प्रेमाचे गाऊ गाणी
मी लिहिणार
कविता तुझ्यावर
तू कशी व्यक्त प्रेम
करी माझ्यावर
साताजन्माची घेऊ
मग सारखे वचने
प्रेमच प्रेम आपले
क्षणभर न थांबणे
प्रेमातली सत्यता
जगापुढे येईल
तुला मला प्रेमात
वेडा वेडी म्हणतील
Loading comments…