ज्ञानदीप जगी लावू
ज्ञान प्रकाशात ज्ञानमय होऊ
ज्ञानदीप तेवत अखंड ठेवू
ज्ञानमार्ग हा जगाला दावू
ज्ञानाचा दीप जीवनी लावूनी
उत्कर्ष आपुल्या साधावा जीवनी
ज्ञानदीप लावू जगी उद्धारुया अवघी धरणी
ज्ञानोउपासना करुनी माथा माँ सरस्वती चरणी
ज्ञानाचा दिवा लावू घरोघरी
अज्ञान मिटवूनी ज्ञान वाटू परोपरी
ज्ञानदीप देऊ एकमेका हाती
अंधकार घालुनी करी जीवनी प्रगती
ज्ञानदीप सतत तेवत ठेवु
ज्ञानयोगी आपल्या जीवनी होऊ
ज्ञानाचा सुकर मार्ग खरा
ज्ञान घेऊ ज्ञान देऊ हाच मनी आपला नारा
Loading comments…