वयाची लागली साठी
समाजा साठी झालो ज्येष्ठ नागरिक
नोकरी मधून झाली निवृत्ती
घसरण झाली शरीराची आणि मनाची
कमी झाली क्षमता इच्छाशक्तीची
अपूर्ण इच्छा करायच्या आता पुर्ण
देत नाही साथ कवटी दाताची
राब राब राबलो आयुष्यभर
पायांना पडल्या भेगाचं भेगा
डोक्यावरचे उडाले केस
आणि चेहर्यावर पडल्या सुरकुत्या
पार पाडल्या सर्व जबाबदार्या
उसने नाही कुणाचे
छंद जोपासील एखादा आवडीचा
सोने करेल जो उर्वरित आयुष्याचे
ओझं कुणावरही होणार नाही
हेचं जिवनाचं सार्थक
अंगात बळ असेल तोपर्यंत
साधत राहिल परमार्थ
Comments
Loading comments…