दादागिरीत आहे सारी मिजास येथे.
शेतीत राबणारा आहे भकास येथे.
गुंडेच आज सारे गादीत झोपलेले.
मातीत लोळतो हा पोटी उपास येथे.
सारे मजेत आहे जोडून मोहमाया.
त्यांच्याच आज सारा होतो विकास येथे.
पन्नास ऐकराचा मालक माजलेला.
घेऊन कर्ज मोठे झोपे झकास येथे.
नेतेच चाखती हे संपात तूप लोणी.
रोटीच सोबती हा खातो मिठास येथे.
Loading comments…