शक्य आहे सगळे असंभव नाही काही
प्रयत्नांती मिळते यश किरण बेदींची ग्वाही
श्रेष्ठ असे हे विचार त्यांचे आणि निर्भीड स्वभाव
पहिली महिला आयपीएस अभिमानाने उंचावले नाव
बदलली कैद्यांची दशा नि महिला सशक्तीकरण
उत्तम समाज कार्यकर्त्या केले सशक्त राजकारण
बाबांच्या पावलावर पाऊल टेनिस खेळामध्ये निपुण
करून घेतली विजय प्राप्ती पदरी घेतले यश मिळवून
ट्राफिक डीसीपीचे पद सांभाळले दिल्ली शहरात
'क्रेनबेदी' हे पडले नाव करता क्रेनची सुरुवात
अनेक पदांवर कार्यरत राहिल्या त्या लागोपाठ
सामना करुन विवादांचा पोलीस सेवेची सोडली गाठ
कित्येक झेलली आव्हाने येता बिकट परिस्थिती
संकटात अडकूनही तिने टिकून ठेवली मन:स्थिती
सन्मान केला समाजाने केले अनंत पुरस्कार प्रदान
शूर ,धाडसी किरण बेदीने नारी जातीची उंचावली मान
Loading comments…