जिथे तीर्थ आणि अमृत होते
गंगा जमुना सिंधूचे पाणी
शब्दांची होते अभंग ओवी
ज्ञाना नाम्या तुक्याची वाणी
अन्नामध्ये भाव मिसळता
प्रसादाची मग येई चव
कर्तव्यात अमुच्या भाव
आणतो सेवा रूप तव
विखुरली ख्याती आमची
झाले तुकडे लहान लहान
नतमस्तक होई शिर अमुचे
म्हणतो भारत देश महान
आमच्या मातीतून येते
जगण्याला अविरत शक्ती
होय.. मी आहे भारतीय
करते भरत रामाची भक्ती
आहेत नि असतील येथे
एकत्र, लक्ष धर्माची कुळे
तरी अंतःकरणात रुजली
माणुसकीची खोल मुळे
Comments
Loading comments…