by Pandit Warade ✓ · 7 Mar 2021
आयुष्य वेचताना छळतात लोक वेडे मी चाललो स्मशानी रडतात लोक वेडे जाता सवे कुणीही काहीच नेत नाही मागे तरी धनाच्या पळतात लोक वेडे पाऊस खूप झाला सारे सडून गेले मातीत त्या तरीही मळतात लोक वेडे
Loading comments…
Comments
Loading comments…