120Log inSign up
by vaishali vartakमाणसे जोडणे
Details

माणसे जोडणे आहे कला

आधी माणुसकीला जागा

 मानवता हाची धर्म जाणा

बांधला जाईल प्रेमाचा धागा


नको मिथ्याभिमान मनी

वाणीत हवी साखर थोडी

सहकाराची भावना मनी

कोण करेल उगा कुरघोडी


जेथे तेथे नको मी पणा

त्रासदायक वाटे इतर जीवा  

वाद विवाद शक्यतो टाळा

माघार घेण्याची नीती ठेवा


द्यावा सदा मान इतरास 

नको मनी शंकेचे मळभ

निखालस भाव ठेवता

माणसे जोडणे होते सुलभ  


 तुकड्या-तुकड्यात नकाशा विश्वाचा

पाठी मागे होते माणसाचे चित्र 

 मानवाचे चित्र जोडले जाता 

सहज झाला विश्वाचा मित्र 

Loading comments…