मराठी माझी माय आहे
भाषेची ती साय आहे
कुणाची ती आय आहे
कुणाची ती गाय आहे।
मराठीला ताई म्हणावं म्हणतो
कधी दाई म्हणावं म्हणतो
जगण्याचा मार्ग आहे माझी
तिला आई म्हणावं म्हणतो।
तुझ्यावर आक्रमण झाले कितीचे
प्रमाणही वाढले अनिष्ट नितीचे
तरी तुला मी जगविणार आहे
कारण तू भूक भागविणार आहे।
Loading comments…