वंशाचा असा दिवा म्हणती मुलगा हवा
सांगा हो मला का दुजाभाव मनात हवा
संसारात असावं उमलत असं फूलं
मुलगी वा असो मुलगा खेळावं फूलं
नसते हो हाती आपल्या ती तो येणे
मग उगाच आपले मागणे
मुलामुळे चाले वंशवेल
समाजात रुळली विचार वेल
मुलगी पण नेईल पुढे वसा
घराघरात हे सांगा जसा
आळीपाळी सौख्य नांदे
देवा सगळ्यांना सद्बुद्धीचे कांदे
मुलगा एकवरी ना वागवे हो
माय बापाला तो विसरे हो
मुलगी सासरच्या संगे
माहेरघर बघे
माया दया त्यात नेहमी असे
मुलापेक्षा मुलगी बरी दिसे
सोडा आता मुलगा मुलगी
नका चालू आता खेळी
आयुष्यात जो असे त्याला स्विकार
संस्काराने त्यात कर्तव्याचा करा उदगार!
Comments
Loading comments…