मुलगा
मुलगा मुलगी समान आहेत
असे मानावे या समाजाने,
भेदभाव निर्माण करण्यासाठी
मग असे जन्मास का घातले देवाने.
मुलीप्रमाणे मुलगासुद्धा
सारेच कामे करतो घरचे,
मग कशाला उगाचच
मुलापेक्षा मुलगी बरी म्हणायचे.
मुलगा मुलगी दोघांनाही
वाढविले जाते सारखे,
मग जबाबदारीपासून
मुलीला का करतात परके.
नेहमीच नावेबोटे उठतात
या समाज कंटकाचे मुलांवर,
म्हणून जबाबदारीची जाणीव
खोलवर रुजते मुलांच्याच मनावर.
जबाबदारी पेलण्याचे भूत
बालवयापासून शिरते त्यांच्या मनात,
अपयश आले जर जबाबदारी पेलण्यात
तर तो खचून जातो आपल्या जीवनात.
सौ मालती बी सेमले स शि
प स सावली, जि चंद्रपूर
Shared with https://goo.gl/9IgP7
Loading comments…