ओढ
ओढ तुझ्या प्रेमाची
लागली पाहता तुला
गेलो तुझ्यात रमून
विसरून गेलो स्वतःला
तू मात्र सोडले असे
कुणाचा ना होऊ शकलो
तुझ्या नादात मी आज
आपल्या नात्यांना मुकलो
कळत होते मला सारे
तरीही म्हटले जायुद्या
तुला तरी कळते का
एकदा मला पाहुद्या
गेलो मी इतका वेडा
तुझ्या प्रेमात होऊन
दिला सोडून जीव
तुला जाताना पाहून
Loading comments…