तुझ्या पावलांच्या स्पर्शाने
फुलून जाते सारे अंगण
आहट देऊन जवळ येण्याची
प्रफुल्लीत करी क्षणात मन
तुझे ते नाजुक पाऊल
अजूनही आठवतात रे मला
दुडू दुडू धावत येताच जवळ
उचलून खांद्यावर घेई तुला
तुझे ते डगमगणारे पाऊल
धिर दिले तुला उभा होण्यास
सोपा पलंगावर मांडून हात
शिकलास तू रे चालण्यास
तुझे ते घरभर चालणे
आनंद देऊन मनाला
मध्येच पडणे जेव्हा होई
जिव जाई रे टांगणीला
आठवण येते रे तुझ्या पावलांची
वाटते परत ते दिवस यावे
धावत येऊन बसताच मांडीवर
हळूच पावलांवर हात फिरवावे
Loading comments…