गंध ओल्या मातीचा दरवळला चहू दिशांनी
सुगंधित वारा बहरला मनी
गुलाबी गार वारा झोंबतो अंगाला
शांत शीतल छाया सुखावती मनाला
नभात जमले ढग ही काळे
थुई थुई थुई थुई मयूर ही नाचे
रिमझिम रिमझिम पडल्या पाऊस धारा
क्षणात सुखावला आसमंत सारा
धरती ओली मन ही ओले
प्रीत बहरली मन ही डोले
मोहरली धरती काया
अंकुरली ही प्रेमळ माया
संतत धारा पडल्या सरी
धरती बहरली, बाग उमलली
झाडे, वेली न्हाऊ लागल्या
बागेमधल्या कळ्या उमलल्या
खळखळ खळखळ निर्झर वाहे
आनंदाचे गीत गाई
मन हर्षाने भरून जाई
प्रेमसुधा मग बरसुनी जाई
हिरवा शालू नेसून आली
धरती माता मनी हर्षली
वर्षाराणी खुदकन हसली
प्रीत फुलांनी बहरून आली
Loading comments…