by Vijay Bhagat ✓ · 21 Feb 2021
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल वारकरी भजनात गाती अभंग विसरुनी जाती दुःख सारे वारकरी भजनात होऊनिया दंग टाळ मृदंग हाती घेऊनी वीणा दिंडीत नाचती धरुनी फेर नाम विठ्ठलाचे नामाचा गजर आषाढीला जाती भक्त सान थोर
Loading comments…
Loading comments…