शिकाऱ्याने अचूक नेम साधला पक्ष्यावर
पक्षी दूर उडून पडला जमीनीवर
उडण्याचा प्रयत्न करू लागला पसरून पंख
नाही बळ होते त्याच्या पंखात
पण आशा होती जगण्याची त्याच्या मनात
शिकारी शोधत होता शिकार
पक्ष्याने एकवटले बळ जीवासाठी घेतली उंच भरारी आकाशात
शिकाऱ्याने अचूक नेम लावला पण पक्ष्याने शिकाऱ्याच्या नजरेची शिकार केली
Loading comments…