नको गड्या वाटून घेऊ
प्रसिद्धीची अशी हाव
हांजीहांजी करण्यातच
होतेय तुझी धावाधाव
बनून खरे साहित्यिक
ठेव तू सरावाची प्राज्ञा
तयारी शिकण्यासाठी
मानुन गुरूचीच आज्ञा
निग्रह कर सातत्याचा
अभ्यासाचा असे ठेवा
चढता यशाची शिखरे
मिळेलच पुर्ततेचा मेवा
संयम सहनशक्ती असे
बाणव लिहिण्याचे बळ
मिळेल तुला योग्य पद
नको फुकाची वळवळ
Loading comments…