कोणाचं काही होवो मला नाही पडलं
मुख्यमंत्री पदासाठी माझं घोड अडलं
काकांनी मला खुणावलं देतो तुला खुर्ची
मी सांगेल तसे वाग
राख माझी मर्जी
मीही मग हो म्हणालो हातात मिळवून हात
कमळी बाईच्या पेकाटात मारली मग लाथ
पळून जाऊन दादाने कमळी ताईशी केले लग्न
तीनच दिवसात त्यांचा संसार झाला भग्न
कोण मराठी कोणतं हिंदुत्व
मला मान्य काकांचे नेतृत्व
मी केला हट्ट काकांनी पुरवला
मुख्यमंत्रि पदाचा घास अलगद भरवला
कमळी बाईच्या घाव बसला वर्मी
हे राज्य आता होईल निधर्मी
कोणाची उतरली धुंदी कोणाला चढली गुर्मी
शेवटी आम्ही सारे राजकारणातले रंगकर्मी
Comments
Loading comments…