120Log inSign up
by Prof. Shalini Sahareश्वास तू
Details

श्वास तू ध्यास तू

आंतरीक ही आस तू

जीवन तू जीवनातील उमंग तू

ओढ तू प्रीत तू महामंगल गीत तू

तू कविता तू हृदयातील प्रेमगीत तू


माया तू ममता तू

जाणीवेतील प्राण तू

स्वप्न तू सत्य तू

यज्ञातील शिव तू


शांत तू मोह तू 

शितल अशी छाया तू

तुझ्या माझ्या नात्यातील

अमीट असे शिल्प तू

व्यक्त मी अव्यक्त तू , 

ध्यास तू, आणि श्वास ही तूच

Loading comments…