ठेवू भाव एकात्मतेचा
नाते राखूया बंधूत्वाचे
दिधले आभाळ एक ची छत
जपण्या नाते विश्व कुटुंबाचे
दीन अती पतीतांना साथ
उच नीचतेला नको मनी ठाव
सर्वा देवू मदतीचा हात
मनी जपूया समतेचा भाव
ठेवू जाण आपण सारे बांधव
मानवता हाची खरा धर्म
एकदुजांना करुनी सहाय्य
प्रेम देणे जगताला हेची कर्म
दिधलेली संतांची शिकवण
आहे महान संस्कृतीचा आरसा
नुरते फिरणे समतेच्या शोधात
असता विश्व-कुटुंब भावनेचा वारसा
Loading comments…