तू अबला तू सबला
तू लक्ष्मी तू सरस्वती
तू बाई तूच आई
तूच अर्धांगिनी तूच सत्यवती--1
माया, ममता, दया,
करुणेचा सागर तू
संसार सागराची नौका
पार करण्याचा आधार तू--2
कधी आजी, आई, पत्नी ,बहीण
तर कधी वीज कडकडणारी
कधी शांत कधी प्रेमळ तर कधी
शिस्तप्रिय ,समजून सांगणारी---3
वडिलांच्या घरात परी लाडकी
कधी आपल्याच घरात परकी
कधी झिजते चंदनासारखी
कधी फुंकर मनावर हलकी---4
तुझ्याशिवाय नाही अग,
घराला घरपण,दाराला शुभ तोरण
घरात लक्ष्मीच्या पावलान तुझ येन
सुख दुःखात माझ्या आनंदानं सामील होणं----5
Loading comments…