या देशाची आहे शान तिरंगा,
आम्हा भारतीयांची जान तिरंगा...।।
'जय हिंद' नारा ओटी, हाती तिरंगा
सारे भारतीय गित गाती तिरंगा,
ऊंच गगणी फडकतो, अभिमान तिरंगा...।।१।।
क्रांतिकारक लढले, घेऊन तिरंगा
विर धारातीर्थी पडले, पाहून तिरंगा,
सदैव फडकत राहो, निशाण तिरंगा...।।२।।
स्वतंत्र्याचे आमच्या प्रतीक तिरंगा
अखंड एकतेचे, जयगित तिरंगा,
कोटी कोटी जनांचा प्राण तिरंगा...।।३।।
सर्व हुतात्म्यांची प्रेरणा तिरंगा,
ताकद खरी आम्हा, देई तिरंगा,
लढतो ज्याच्यासाठी जवान तो तिरंगा...।।४।।
करतो ज्यास प्रणाम आम्ही तो तिरंगा,
ऊंच गगणी फडकतो, पहा तिरंगा,
हा देश माझा महान, महान तिरंगा...।।५।।
क्रांतिची पेटती मशाल तिरंगा
या भारतमातेची हा ढाल तिरंगा,
लाभले आम्हा हे वरदान तिरंगा
आम्हा भारतीयांची शान तिरंगा... ।।६।।
Comments
Loading comments…