हृदयावरती " पेन " उमटला
अश्रूंनी भिजले फुले
हौदावरचे झाकण तुटले
जीवन झाले खुले
शिक्षणवेड्या जोतीबामुळे..
अवखळ सुंदर रायगडाच्या
पायी नमले फुले
शुद्रपणाचा कलंक मिटला
धन्य जाहले कडे
शिक्षणवेड्या जोतीबामुळे..
विशाल निरभ्र आकाशाच्या
क्षितिजावर उमलले फुले
नारी जन्माचे कौतुक झाले
हरिणी कुरणावर बागडे
शिक्षणवेड्या जोतीबामुळे..
अगाध सुंदर वसुंधरेच्या
कुशीत जन्मले फुले
शिक्षणगंगा वाहू लागली
मुक्त झाली अक्षरे
शिक्षणवेड्या जोतीबामुळे..
Loading comments…