ओठांत शब्द माझ्या
स्पर्शात चिंब झाले
काजळ नयनांचे
आठवणींनी तुडुंब न्हाले
स्वप्नांत रंगला तु राधेच्या
कृष्णसखा तु माझा
मनात पिसारा फुलवून गेलास
उलटून गेली ती रात्र
विरहात भिजलेली
वाट पाहते मी
मंद पावलांनी सजवेल कधी
तु माझं आंगण
बिलगण्यास तुजला
ह्दय कधी ओलावणार
अश्रू विरहाने भरलेली पहाट
प्रेमाने कधी न्हाहाळणार
मी अशीच तुझी
तुला जपणारी
तुझ्याचं सुखाने
मी हसणारी
मनात माझ्या तुला जिवंत ठेवणारी
विरह मुक्तीचा सुगंध घेऊन येशील
तु माझ्या अंगणा
वर्षा प्रेमींचा मोरपिसारा
मिळून शहारु या
बाहुंत लपलेलं जग
डोळ्यांत साठवू या
स्वप्नातले गाणे
जीवनात गुणगुणू या.
Comments
Loading comments…