अशी वाट वळणाची
कडे कपारी मधून
नागमोडी वळणांनी
जाते दऱ्या खोऱ्यातून
आड रानातून जाते
काटे कुटे पचवते
असो कुणी वाटसरू
योग्य स्थळी पोचवते
वाट जीवनाची सुद्धा
अशी आहे अवघड
मृत्यू येईतो चालते
जगण्याची धडपड
येवो कितीही संकटे
नाही जायचे खचून
पार करा ज्याची त्याने
वाट कंबर कसून
नको थांबू क्षणभर
पुढे पुढेच जायचे
वाट सांगते मनाला
कणखर बनायचे
Loading comments…