जीवनात एकदा तयारी ठेवा
अन्यायाविरुद्ध लढण्याची ,
शौर्याने लढले पाहिजे
मग भीती नसावी मरण्याची .
युक्तीवाद आणि तर्कवादाने
आले पाहिजे लढता ,
संघर्ष करूनच जीवनात
आपल्याला येते जगता .
मेहनत आणि संघर्षाने
यशाचे शिखर गाठता येते ,
अशा शूरवीरांचा मग
जग आदर्श घेते .
Loading comments…