अगोदर ज्या गल्ली बोळात सायकल चालविणे जिकरीचे होते. तेथे गाडी देखील चालविता येऊ शकत होती. गावातल्या अनेक जागा नामशेष झाल्या होत्या मात्र शेखरच्या मनात त्या आठवणी आज ही कायम होत्या. लग्न संपल्यावर जेवण करून राजेशचा निरोप घेतला आणि येतांना जो उत्साह होता तो उत्साह परत जातांना त्याच्या चेहऱ्यावर मुळीच नव्हता. गावाकडच्या आठवणी मनात साठवून खिन्न मनाने शहराच्या दिशेने गाडी पळवू लागला.
Loading comments…