आज उशीर केलास तू ...... कूठे होतास... कधीची वाट बघते आहे तुझी.... " स्मिताने यशला आल्याआल्याच विचारलं. थोडीशी रागावलीच ती. " अगं..... काम होता थोडं .... बॉसनी सोडायला नको ... म्हणून थोडासा उशीर झाला " तरीही ती रुसलेलीच होती. यश सुद्धा मग तसाच बसून राहिला तिच्या शेजारी. थोडावेळ असाच गेला. " बोल ना काहीतरी ... गप्प का झालास ? " , " तू बोलतच नाही आहेस आणि मी एकटाच बडबड करत आहे. लोकांना वाटेल मी वेडा आहे. " तशी स्मिता हसली.
Loading comments…