Loading…
तो दिसला तरी आम्ही मनोमनी दूर दूर जाऊन बसतो किंबहुना दूर बसावे लागते ही वास्तवता जाणवते. आताशा आठवण जरी आली तरी कसे म्हातारपण जगू नये ,असू नये याची उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहणे होते आणि आदर्श इतकाच घ्यावा वाटतो, नाळ जोडली म्हणतात पण नाळ कशी तुटते हे त्याने दाखवून दिले याची जाणीव होते. जादा अभ्यास, जादा वाचन आणि पराकोटीचा अहंकार जर असेल तर एकलकोंडे जीवन किती भयावह असते याचे प्रत्यक्ष मूर्तरूप अनुभवास येते आणि वाटते अति तेथे माती हे खरेच सत्य आहे.
Comments
Loading comments…