शेवटी जन्मदात्या बापाला गोविंदरावांना,वृद्धाश्रमाच्या दारांत,हात धरून स्वत: नेऊन सोडले. गोविंदराव राजुला विणवत होते, हातापाया पडत,राजुला,डोळ्यांत पाणी आणून, आर्जवे करून पकडत होते."मला काही देऊ नको. राहण्यास पथारी व एक वेळच, दोन भाकरी खायला घाल", पण कठोर,पाषाणह्रदयी राजुला पाझर फुटला नाही. चलतचित्राप्रमाणे त्यांच्या डोळ्यासमोर राजुचे बालपण तरळत होते. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. आपण जगात एकटे आहोत, अन फक्त मरणाची वाट पाहात, ईश्वर ठेवील तोपर्यंत जगायचे, या जाणिवेने ते मटकन वृद्धाश्रमाच्या अंगणातच बसले.
Loading comments…