सर्वांनी मिळून सुरेशच्या घरच्यांना जमेल तेवढं आर्थिक हातभार दिलं. सुरेश गरीब होता पण कष्टाळू, स्वाभिमानी आणि होतकरू होता. याचा सर्व मित्रांना अभिमान देखील वाटत होता. सर्वांनी मिळून त्याचाच घरासमोर एक वडाचे झाड लावलं आणि त्याला नाव दिलं मैत्रीचं झाड. दरवर्षी ते सर्व मित्र त्या वडाच्या झाडाखाली एकत्र येतात आणि आपल्या जिवलग मित्राची आठवण काढतात. आज ते झाड सर्वाना मैत्रीची शिकवण देत असते.
Loading comments…