जया, एक चुणचुणीत व देखणी मुलगी. एकुलती एक असल्याने लाडात वाढलेली. घरची परिस्थिती बेताचीच. तरीही आई-वडील तिचे संपूर्ण लाड पुरवायचे. बालपण अगदी मजेत चाललं होतं. अवखळ, हसतमुख व सुंदर, सर्वांना हवीहवीशी वाटणारी जया आता दहावीत आली होती. शिकून खूप मोठं व्हायचं स्वप्न त्या दिवशी भंगल होतं, जेंव्हा दहावीची परीक्षा संपताच आई-वडिलांनी जयासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली.
Loading comments…