सायंकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी मी तयार झालो होतो. माझ्यासोबत माझा मित्र सुरेशही नित्यनेमाने फिरायला येत असे. त्यादिवशी मी त्याची वाट पाहात असताना त्याचा चिरपरिचित आवाज आला. पाठोपाठ तोही आत आला. आल्या आल्या जोरजोरात हसायला लागला. मला काहीच अर्थबोध होत नव्हता. "सुरेश, अरे काय झाले? असे हसतोस का ?"
Loading comments…