"चल मयुरी या त्रासातून मुक्त हो तुला नेण्यासाठी मी आले आहे. मुलं-बाळं सगळी मोहमाया आहे. यातून तू मुक्त हो. चल. टाकसगळं विसरून. नाही माझे ते एकटे राहतील. तू सगळं सोडून निवांत चल. तुला वेदना होणार नाहीत आरामात झोप येईल. चल मी घ्यायला आले." मयुरी पुटपुटताना दिसत होती. पंकज दीपक असे म्हणत होती. तितक्यात वारा सुटला. जणू वादळ सुटले आहे असे वाटत होते. लाईट गेली. सगळीकडे अंधार झाला होता. सतीश अरे ज्योत तरी लाव. वैभव म्हणाला अरे जीवन सगळं शून्य झाले. ज्योतही शून्य . शून्य ज्योत.
Loading comments…