
None माझ्या कथा ह्या ओघवत्या भाषेत असून वाचताना कंटाळा येत नाही.माझ्या कथा ह्या निव्वळ मनोरंजना साठी असतात.कथांमध्ये उपदेश करणे हा हेतू नसतो माझ्या कथा जीवनात नवीन उर्जा उत्पन्न करतात प्राप्त व परिस्थितीत, परिस्थितीशी दोन हात करण्याचे बळ देतात असे माझे मत आहे. माझ्या काही कथांचा शेवट अनपेक्षीत असाच असतो.त्यामुळे वाचणाऱ्याची उत्कंठा शेवट पर्यत टिकून रहाते असे माझे मत आहे..माझ्या कथांमध्ये अश्लीलता.नसते. माझ्या कथांमध्ये नाट्य असते. माझ्या कथा लहान मुलांपासून जेष्ठांपर्यत सर्वानाच आनंद देतात. मी इतर लेखन करतो पण मला खरा आनंद कथा लेखनात मिळतो.लहान पणा पासून माणसाला कथा ऐकायला आवडतात.आजी कडून लहान पणी कथा ऐकण्याची परवणीकाही वेगळीच असे.श्रीशिवाजी महाराजांच्या साहस कथा तसेच सिंदबादच्या सफरी .म्हणजे खरोखर साहस व मनोरंजनाचा अद्भत खजिना असे.या कथा वाचताना माझी तहानभूक हरवत असे.लहान चांदोबा मुलांचे चांदोब मासीक मी नेहमी आणत असे. मला कथा लिहिण्याचा छंद आहे..माझ्या काही कथा दिवाळी अंकात या पूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत.
No audio yet.