तिने त्याच्या डोळ्यात पाहीले. तिचे डोळे भरून आले होते. काही न बोलता ती टँक्सीत बसली आणि टँक्सी भरधाव वेगाने निघून गेली. तो जागीच उभा राहीला. तिने उच्चारलेले वाक्य त्याच्या कानात गुंजत राहीले आपण लोकांना सुखी दिसतो पण आपण सुखी असतोच असे नाही.तो विचारात पडला..आपण कोण बरोबर आणि कोण चूक हे कस ठरविणार शेवटी परीस्थिती आणि गरजा याच माणसाला वागायला शिकवत असतात.तो चालत राहीला.
Loading comments…