आणि केव्हढ्याने वीज चमकली... केवढा तो प्रकाश.. !! क्षणार्धात कोणी दिवा लावावा आणि चट्कन बंद करावा , असं झालं ते. अमोलचे डोळे दिपून गेले. अमोलने वरच्या दिशेला पाहिलं. समोरच्या डोंगरावर त्याला मानवसदृश्य आकृती दिसली. चेहरा तर दिसतं नव्हता. उंच ठिकाणी उभा आहे, त्याचं लक्ष आपल्याकडेच आहे, हे अमोलने ओळखलं....... मुसळधार , टोचणारा पाऊस.. सोसाट्याचा वारा आणि ती व्यक्ती.. त्याच्या मागे विजांचा कडकडाड होतं होता. इतक्या दुरुन सुद्धा त्याचे वाऱ्याने उडणारे केस अमोलला दिसतं होते. खरंच का, सुप्रीचा आकाश परत आला आहे का .
Loading comments…