या उलट काही लोक दांभिकपणाचा आव आणतात. स्वतःला मोठे धार्मिक समजतात.आध्यात्मिक समजतात. त्यांच्यातील भूतदया जागृत होते. पण अशी माणसे ड्रायव्हरला तुच्छ समजतात .त्यांना माणुसकीहीन वागणूक देतात. त्यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत करत नाही. वेळेवर तुटपुंजा पगार देत नाही. ही माणसे कुत्रे पाळतात. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक खास नोकर ठेवतात. त्याला वीस हजार पगार देतात. त्याला मांस, मासे, दूध, अंडी असा सकस आहार देतात. पण ड्राईवरला पगार देतांना नाकतोंड मुरडतात.अशा माणुसकी नसलेल्या माणसांकडे ड्रायव्हर अजिबात टिकत नाही.
Loading comments…