भाळ थोडं ढगाळलेलं होते. खरंच का… आपण गुंतंत चाललो आहे का पूजात… नाही… माझा कंट्रोल आहे मनावर. तसं नाही होणार कधी. मला पुन्हा प्रेम नको आहे कोणाचं. नाहीच पडणार प्रेमात… मग सुवर्णा असं का बोलते… मस्त थंड हवा आली, विवेकने वर पाहिलं… पाऊस तर नाही पडणार आज.… आज धुकं मात्र राहील आकाशात… आणि खूप साऱ्या चांदण्या चमकत असतील स्वतंत्रपणे, चंद्र नाही म्हणून. आज आपला " तारा " नाहीच दिसणार पुन्हा…. धुकं दाटलाय म्हणून … पुन्हा एकदा " धुक्यातलं चांदणं " …….
Loading comments…