सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे कानात "भय इथले संपत नाही" चालू असत आणि त्याच वेळी मनाच्या आणि बुद्धीच्या कोणत्या तरी आर्त कप्प्यात माऊलींची विराणी "पडिले दूर देशी मज आठवे मानसी"गुणगुणत एक अंतर्मन अस्वस्थ फेऱ्या घालत असते. या दोन गोष्टींचा, या दोन रचनांचा आपापसांत तसा काहीही संबंध नाही. पण तरीही, ग्रेसची ही कविता मला माऊलींच्या विराणीत घेऊन जाते.
Loading comments…