Loading…
मग आमचा विमान प्रवास झाला सुरू.......अडीच तास मुंबई ते दुबई.......आणि 2 तासांनी लगेच दुसरं विमान...ते ६-७ तासांच होत दुबई वरून युरोपला जायला.......रात्रभर.... अर्धा दिवसभर विमानाने अंतर कापून आम्ही दुपारी प्राग विमानतळावर पोहोचलो........बाहेर सामान सुमान घेऊन पोहोचलो..........एकदम कडाक्याच्या थंडीने आमचं स्वागत केलं ...की या ...या...या......या...आलात....गरमीतुन...??.......त्यात वाहता थंड वारा आणि चिरीमिरी पडणारा पाऊस.........थंडीमुळे तोंडातून येणारा वाफाळता धुर.........काय मजा घेतली त्या थंडीने आमची आणि आम्ही त्या थंडीची...... ! कुडकुडत....थरथरत्या अंगाने बसमध्ये चढलो....हाच तो पहिला अविस्मरणीय थंडीचा अनुभव.......!
Comments
Loading comments…