तिच्या चेहऱ्यावर नाही पण तिच्या डोळ्यात जाणवली मला तिची कैद .. तिला मनासारखं सासर भेटलय पण मनासारखं स्वतंत्र देणारा नवरा नाहीच....कदाचित .. ती प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याची नाहीतर सासूची परवानगी घेत होती, स्वतःच्या विचाराने काहीच करत नव्हती... बोलेल तिच्याशी कधीतरी पण आत्ता मला माझ्या नवऱ्यावर प्रेम येतेय .. तुम्ही मला मुल्यवान दागिना दिलाय स्वतंत्र .. विचार करण्याचं आणि माझे विचार जगण्याचंही ... म्हणूनच मला ते एकपदरी मंगळसूत्र घालण्यात खूप आनंद आहे ... मध्येच त्याच्या मुलीचं झोपेत रडणं सुरु झालं आणि दोघेही तिला सांभाळण्यात गुंगु झाले...
Loading comments…