हा चालेल ना.. मला काहीच प्रॉब्लेम नाही ... मित्रांसाठी काही पण " विवेकने एकदा त्रासिक नजरेने दोघांकडे बघितलं. " ठीक आहे.. काय ती लवकर तयारी करा... आजचं रात्री निघू मुंबईला... " प्रिया आनंदात, संदीप विमानाने जायला मिळणार म्हणून खुशीत... आणि विवेक... एक सोडून दोघे-दोघे त्याच्या सोबत म्हणून tension मधे... पण मैत्री खातर तरी केशवला शोधावं लागेल.. याच विचारात... संध्याकाळी तयारी करून... सामान बांधून संदीप ,प्रिया सोबत मुंबईकडे रवाना झाला विवेक.
Loading comments…