Loading…
चंदू या पात्राचे वाचन मायशा करत होती. तिच्या वाचण्यात गोडवा व कोमलता होती. वाचन प्रभावी झाले. परीक्षकांनी तिला उचलून घेतले. तिचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला होता. बक्षीस म्हणून ट्रॉफी दिली होती. त्यासोबत तीन पुस्तकेही दिली. पुस्तकाचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शास्त्रज्ञ रूडाल्फ, लाल बहादूर शास्त्री. तिन्ही पुस्तके तिने वाचून काढली. तिने ठरवले मी खूप शिकणार. कितीही संकट येऊ मी सामोरे जाईल. या तिन्ही व्यक्तीसारखे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करीन. ट्रॉफीवरचा प्लस जणू सांगत होता. प्लस हा तुझा प्लस पॉइंट आहे. तुझ्या जीवनात आत्मविश्वास प्रेरणा भरेल. तू उंच भरारी घेशील. खरंच तिने गरुड झेप घेतली होती. तितक्यात बेल वाजली दूधवाला आला होता. पुन्हा रोजच्या कामाला माईशा लागली.
Comments
Loading comments…